Advertisement

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी

प्रजापत्र | Monday, 21/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई-आगामी मान्सून संदर्भात स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने अंदाज वर्तवली आहे. २०२२ वर्षात मान्सून सामान्य राहाणार असून सरासरीच्या ९७ ते १०४ टक्के मान्सूनचे प्रमाण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

 

ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा चांगले पर्जन्यमान राहणार असून, एप्रिल महिन्यात मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान वर्तवण्यात येणार आहे.मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता मात्र नंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मागील दोन वर्षाचा पावसावर अल निनो वादळाचा परिणाम जाणवला. परंतु यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तितका परिणाम राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, मान्सूनच्या मार्गातल अडथळे देखील कमीकमी होताना दिसत आहेत.

Advertisement

Advertisement