Advertisement

अंत्यविधीसाठी जाताना कारचा अपघात

प्रजापत्र | Monday, 21/02/2022
बातमी शेअर करा

आष्टी-तालुक्यातील देविनिमगाव येथे अंत्यविधीसाठी जात असताना पैठण-बारामती रोडवर सोमवारी (दि.२१) दुपारी कार आणि जीपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून सहा जखमी झाले आहे.
 मुनीर हाजीर आतार (वय-७०) असे मृताचे नाव आहे. बारामती येथील रहवाशी असलेले आतार कुटुंबातील सदस्यासह शेवगांव येथील पाहुण्याच्या अंत्यविधीसाठी कारमध्ये (क्रमांक एम.एच. १४, बी.सी.८१५७ ) जात होते. दुपारी अडीजवाजेच्या सुमारास पैठण-बारामती रोडवरील देवीनिमगाव येथील वळणावर कार आणि धामणगांववरून कड्याकडे येत असलेली जीपची ( क्रमांक एम.एच. ४२ ए.एस. ४७५५ ) समोरासमोर धडक झाली. 
अपघातात कारमधील मुनीरभाई आतार यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील मुलगा, सुन, भाची, नातू आणि जीपचा चालक व अन्य एक असे सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Advertisement

Advertisement