नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी आहे. सीआयएसएफ (CISF Recruitment 2022) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबलपदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीप्रकियेला सुरुवात झाली असून याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 31 मार्चपर्यंत उमेदवारांना सीआयएसएफमधील भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करता येतील. 249 पदांवर सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
cisf.gov.in या वेबसाईटवर जाऊन इच्छूक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येऊ शकेल. सीआयएसएफमध्ये भरती होण्यासाठी बारावी पास आणि स्पोर्ट्स कोटामध्ये प्रतिनिधित्व केलेलं असणं महत्त्वाचं आहे. वय वर्ष 18 ते 23 असलेल्यांना या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल. तसेच एससी आणि एसटीसाठी वयात पाच वर्षांची सूटही दिली जाणार आहे. तर ओबीसी वर्गासाठी उमेदवारांना तीन वर्षांची सूट दिली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सीआयएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विस्तृत माहिती मिळवता येईल.
नोकरी मिळाल्यास 25 हजारांपासून ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार
संपूर्ण प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळाल्यास 25 हजारांपासून ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांना निवड प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. यासाठी इच्छूक उमेदावारांना 31 मार्चच्या अगोदर आपला अर्ज द्यावा लागणार आहे. महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातींमधील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही आहे. तर इतर सर्व वर्गातील उमेदावारांकडून 100 रुपये शुल्क अर्जासाठी आकारलं जाणार आहे.