कराड : सर्वजण झोपेत असताना एका घराला आग लागली लवकर लक्षात न आल्याने ती बाजुच्या घरापर्यंत पोचली. यामध्ये घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीचा भडका उडून तब्बल २४ घारासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना काराड बसस्थानक जवळील वस्तीत घडली आहे. यामध्ये नागरिकांच्या जागरुक्तेमुळे जीवितहानी टळली परंतु काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल २४ घरं सापडल्याने अनेक कुटुंबांना सरकारी शाळेचा आधार घ्यावा लागला आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, कराड येथील बसस्थानका जवळ असलेल्या वस्तीत शुक्रवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागली. रात्रीची वेळ असल्याने सर्वच झोपेत असल्याने आग लागल्याचे लक्षात आले नाही. आग वेगाने वाढत गेली. काही वेळाने आग लागल्याचे लक्षात येताच महिला, मुलं आरडाओरडा करत रस्त्यावर आले. प्रसंगावधान राखत झोपेत असलेल्या शेजाऱ्यांना जागे करुन घरा आणले. एकीकडे नागरिक माणसांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना आग रौद्ररूप धारण करत एक-एक घराला आपल्या कवेत घेत पुढे सरकत होती. त्यातच आगीच्या विळख्यात सापडलेल्या चार घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, शहरातील अनेक भागात ऐकू आला. यामुळे शहरात खळबळ उडाली. या स्फोटानंतर आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले पहाता पहाता तब्बल २४ घर जळून खाक झाले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीची इतकी मोठी घटना घडून ही सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. २४ घरं जळून खाक झाल्याने आयुष्यभराची कमाई पुर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून अनेकांचा संसार उघड्यावर आलं आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.