Advertisement

माझ्या हत्येचा कट रचला जातोय

प्रजापत्र | Friday, 18/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने हिने आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. वैशालीच्या फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. 2 दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं आवाहन वैशाली भैसने हिने सोशल मीडियावरुन केलं आहे. त्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोची विजेती राहिलेल्या वैशालीने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. त्यानंतर ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या इतर शोमध्येही झळकली. नुकतंच तिने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

 

काय आहे वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट?
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. 2 दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं वैशालीने फेसबुकवर लिहिलं आहे.

 

पाहा वैशालीची फेसबुक पोस्ट

 

कोण आहे वैशाली भैसने?
सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोचे विजेतेपद 2008 मध्ये वैशालीने पटकावले होते. त्यानंतर तिने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला. सोबतच झी टीव्हीशी 50 लाख रुपयांचा संगीत करार, ह्युंदाई i10 कार आणि एलसीडी टीव्ही तिला बक्षीस स्वरुपात मिळाले. सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियाच्या “रॉक घराणा”ची ती सदस्या होती. सा रे ग म प चॅलेंज 2009 मधील तिच्या संपूर्ण प्रवासात तिने स्वतःला एक अष्टपैलू गायिका असल्याचे सिद्ध केले.

Advertisement

Advertisement