बीड (प्रतिनिधी)-कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना ५० हजाराचे अनुदान देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात यासाठी २१९७ व्यक्तींचे अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सीईओ तथा बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी ही माहिती दिली.
कोरोनाने देशभरात मोठ्या प्रमाणावर बळी गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अशा बळींच्या वारसांना मदत करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारांनी ५० हजाराची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बीड जिल्ह्यात यासाठी आतापर्यंत ३३०५ अर्ज आले होते. याची छानणी करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने २२१५ अर्ज मंजूर केले. तर जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समितीने ८२ अर्जांना मंजुरी दिली. यांच्या अनुदानाचे प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी ही माहिती दिली.
फेटाळलेल्या अर्जांचा आकडा मोठा
एकीकडे प्रशासनाने तब्बल २२०० अर्ज मंजूर केले असले तरी फेटाळलेल्या अर्जांची संख्याही मोठी आहे. तब्बल १०८५ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. बहुतांश प्रकरणात सुट्टी झाल्यानंतर एक महिन्यापेक्षा अधिक काळाने बळी गेल्याचे कारण समोर आले आहे.