मुंबई : पोलीस भरती असो वा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, प्रत्येकवेळी मराठा आरक्षण स्थगितीचा मुद्दा समोर आला. पुढेही भरती किंवा परीक्षा असल्यास मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होईल, ही शक्यता नाकारता येत नाही.मराठा आरक्षणाला स्थगिती मिळून आता महिना उलटला आहे. 9 सप्टेंबर 2020ला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला 'तूर्तास स्थगिती'चा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गेल्या महिन्याभरात मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे.मात्र, इथे नेमका एक पेच निर्माण होताना दिसतोय. हा पेच काय आहे, तर मराठा आरक्षणामुळे भरती आणि परीक्षांवर परिणाम होत असताना, आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या मराठेतर समाजात नाराजी दिसून येते.
बातमी शेअर करा