Advertisement

किरीट सोमय्यांचे,राऊतांना आव्हान

प्रजापत्र | Wednesday, 16/02/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचं जोरदार खंडन केलं. अलिबागजवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले आपल्या नावावर केले असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्याविरोधात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी काल ठाकरे कुटुंबाचा आणि बंगल्यांचा काही संबंध आहे, ही बाब नाकारली होती. अलिबागमधील ती बेनामी प्रॉपर्टी असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. असे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्यानं मारू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. या आरोपांना उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मोठा हंगामा केला. मला जोड्याने मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे पुरावे पहावे, तपासाने आणि मग हवं असेल तर मला जोड्यानं मारावं, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतच पायातले जोडे काढले

 

काय म्हणाले किरीट सोमय्या?
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी मोठा ड्राम केला. ते म्हणाले, ‘ त्यांनी हा बंगल्यांचा विषय काल का काढला. संजय राऊत जोड्यांनी मारा म्हणताय किरिट सोमय्याला? अरे जोड्याने मला मारणार तू… असे म्हणत किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत पायातला जोडा काढला. ‘मला मारायचं असेल तर मला मारा की जोड्यानं.. मी माझाच जोडा देतो संजय राऊतांना.. मी उभा आहे तुमच्यासमोर. 19 बंगल्याच्या वादाप्रकरणी संजय राऊत किरीट सोमय्याला जोडे मारणार असेल तर मी माझा जोडा संजय राऊतच्या हातात द्यायला तयार आहे. त्यानी केलेल्या बंगल्यासंबंधी मी पुरावे दिले आहेत. त्यांनी याबाबत रश्मी ठाकरेंना याबाबत विचारावं..’ असा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला.

 

रश्मी वहिनींना राऊतांनी विचारावं – किरीट सोमय्या 

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, रश्मी वहिनींना संजय राऊतांनी विचारावं की, रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी या बंगल्यांसाठीचा टॅक्स भरलाय की नाही? आम्ही आरटीजीएस केलं नव्हतं, आम्ही कर भरला नव्हता. ग्रामपंचायतीनं आमच्या नावावर बंगले केले नव्हते. प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये आमच्या नावाने नाही, किरीट सोमय्याने आमच्याविरोधात पोलीस तक्रार केलेली नाही.. असं जर रश्मी ठाकरे म्हणाल्या तर मला दोन्ही जोडे मारा…’ असं किरीट सोमय्या म्हणाले.

Advertisement

Advertisement