मुंबई-प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. ते 69 वर्षांचे होते.
बप्पी लहिरी यांना संगीत क्षेत्रातील डिस्को किंग म्हटले जात होते. त्यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी होते. बप्पी लहिरी हे त्यांच्या संगीतासोबतच सोन्याचे दागिणे घालण्याच्या शैलीसाठी देखील ते ओळखले जात होते. 1980-90 च्या दशकात ते लोकप्रिय झाले होते. 2014 मध्ये पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.
1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदापर्ण केलेल्या बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. 'डर्टी पिक्चर' या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या 'उ लाला' हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं. 2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लहरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेली 29 दिवस बप्पी लहरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं.
बप्पी लहरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांमधी गाणी संगीतबद्ध केली.