Advertisement

शिक्षक संघाच्या रक्तदान शिबिरात 101 शिवभक्तांनी केले रक्तदान

प्रजापत्र | Tuesday, 15/02/2022
बातमी शेअर करा

परंडा -  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा परांडा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन परांडा तालुका पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी 101 शिवभक्तांनी रक्तदान केले.

         या शिबिराचे उदघाटन तहसीलदार रेणूकादासजी देवणीकर, गटशिक्षण कार्यालयाचे गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे, शिवसेनेचे युवा नेते रणजित पाटील, परंडा केंद्राचे केंद्रप्रमुख अरूणजी पाटील, रा.गे शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक अरुण खर्डे, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष नागनाथ रगडे या मान्यवरांच्या उपस्थितीत  झाले. 

       रक्तदान शिबिरामध्ये यावर्षी वैद्यकीय क्षेत्रासाठी  प्रवेश निश्चित झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला. शुभजीत नानासाहेब बगाडे, मनीष महादेव जाधव, आदेश अरुण खर्डे, शरद शंकर पाटील, वैभव रघुनाथ केमदारने, कांचन शिवाजी पंडित वैष्णवी धनंजय होरे, करण चंद्रकांत शिंदे, मोनिका सुनील बोराडे शुभराज हनुमंत भोगील या भावी डॉक्टरांचा व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला. तसेच तालुक्यामध्ये वृक्षसंवर्धन चळवळ उभी केलेले सुधीर वाघमारे यांचा मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने,उस्मानाबाद जिल्हा वृक्ष संवर्धन समिती जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब घोगरे यांची तर तालुका अध्यक्षपदी शिवाजीराव पंडित यांची निवड झाल्याने उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.

              उस्मानाबाद जिल्हा शिक्षक पतसंस्था मर्यादित तेर चे संचालक पद यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल श्रीमंत चौरे यांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आनंद गायकवाड यांचा तर कनिष्ठ सहाय्यक पदी नुकतीच नियुक्ती मिळालेल्या सुषमा माने यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

       शिक्षक संघाच्या हाकेला साद देऊन जवळपास १०७ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.त्याचबरोबर या वेळी सहकुटुंब रक्तदान करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली. 

     या रक्तदान शिबिरासाठी  परंडा पंचायत समितीचे सभापती सतीश दैन, उपसभापती पोपट चोबे पंचायत समितीचे सदस्य गुलाब शिंदे, नामदेव भाग्यवंत ,कृषी विस्तार अधिकारी अंगद बोडके तसेच राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे  राष्ट्रीय उपाध्यक्ष मा बाळकृष्ण तांबारे, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, शिक्षक संघाचे राज्य चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हा शिक्षक सोसायटीचे संचालक अनिल बारकुल, मोहनराव जगदाळे, वैजिनाथ नरके,जिल्हा कार्याध्यक्ष किशोर गलांडे, प्रशांत घुटे, शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, आप्पासाहेब गोफणे, कळंब चे नितीन गायकवाड यांनी आवर्जून उपस्थित राहून शिक्षक संघाच्या महा रक्तदान शिबिरास शुभेच्छा दिल्या.

      रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष रवी कापसे, साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर देवराम, माजी चेअरमन जयदेव गंभीरे, व्हाईस चेअरमन आप्पासाहेब भोंग, उमेश काळे, यशवंत कानगुडे, तालुका संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष शाहीर शरद नवले, सरचिटणीस नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष दैवान पाटील, प्रसिद्धीप्रमुख शिवाजीराव पंडित, संपर्कप्रमुख विजयकुमार माळी, तानाजी मिसाळ, प्रकाश ठवरे, ज्ञानदेव शिंदे, सानेगुरुजी शिक्षक पतसंस्थेचे संचालक धनाजी खरात, सचिन केमदारने, आदीकराव शेळवणे, शिवाजी कांबळे, महेश निंबाळकर, भाऊसाहेब जगताप, सर्जेराव ठोकळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रीती वीर, साधना पंडित, रामकुंवर घोगरे, सुवर्णा खटाळ, सविता मणके, आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement