Advertisement

आठवडी बाजाराला वैद्यकीय कचऱ्याचा विळखा

प्रजापत्र | Sunday, 11/10/2020
बातमी शेअर करा

अशोक शिंदे

बाजारतळाला आले उकीरड्याचे स्वरूप

नेकनूर : ग्रामस्थांच्या वर्दळीचे आणि प्रमुख ठिकाण असलेल्या आठवडी बाजाराला वैद्यकीय कचऱ्याचा विळखा झाला असून बाजारतळाला उकीरड्याचे स्वरूप आले आहे.महत्वाचे म्हणजे  वैद्यकीय कचऱ्याच्या विळख्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायतने याची तात्काळ दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
                           कोरोना विषाणूचा संकटामुळे येथील आठवडे बाजार बंद आहे.जुलैच्या मध्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.पण बंद असलेल्या आठवडे बाजारात अनेक जण मुक्त हस्ते कचरा आणून टाकू लागले.त्यामध्ये घरगुती कचरा,प्लास्टिकच्या कॅरीबॅग, कोंबड्यांची पिसे यासारखा एक ना अनेक प्रकारचा कचरा आठवडे बाजाराच्या प्रांगणात दिसून येऊ लागला.त्यामुळे या आठवडे बाजाराला उकीरड्याचे स्वरूप आले आहे. आठवडी बाजार बंद असल्या कारणाने या ठिकाणचा वापर सर्रास शौचासाठी वापरत असल्याने याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असतांनाच याच ठिकाणी गावातील नागरिकही कचरा टाकत आहेत. त्यामुळे बाजारतळावर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे.आता तर यावरही कहर झाला आहे.चक्क या ठिकाणी आता वैद्यकीय कचरा आणून टाकला जात आहे.प्लास्टिकच्या बॅगेत भरून किंवा खुले आम दवाखान्यातील सलाईनच्या मोकळ्या बाटल्या, इंजेक्शनच्या सुई,मास्क,ग्लोव्ह,कपडे,वापरलेली औषधे,रिकामे खोके,सिरिंज वापरलेल्या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या आणि असेच खूप प्रकारचे साहित्य सर्रास बाजारात फेकले जात आहे मात्र याकडे मात्र ग्रामपंचायत लक्ष द्यायला तयार नाही.

 

Advertisement

Advertisement