Advertisement

बीड जवळील सह्याद्री देवराईला आग

प्रजापत्र | Sunday, 13/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१३ – सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या बीड शहराजवळील पालवन येथील सहयाद्री देवराई च्या डोंगराला पहाटे आग लागली. यामध्ये हजारो झाडे जळाली आहेत. नेमकी आग कशामुळे लागली याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही. या आगीमुळे वृक्षप्रेमीमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

वृक्ष संमेलनाचा हा प्रयोग पहिलाच असल्याने अबाल वृद्धांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. देवराई हे बीड जिल्हा वासियांसाठी एक पर्यटनस्थळ म्हणून अल्पावधीत नावारूपाला आले. मात्र आज पहाटे या भागातील डोंगराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये लहान मोठी हजारे झाडे जळून खाक झाली आहेत. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय वन विभागाला आहे याचा तपास आता सुरू आहे. मात्र यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.सुदैवाने या ठिकाणच्या तीन-चार जणांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे झाडांची हानी टळली. आग लवकर आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून प्राथमिक अंदाजानुसार, मोठी 500 झाडे जळाली आहेत तर लहान झाडांची संख्या अद्याप समजू शकली नाही असं सह्याद्री देवराईच्या सदस्यांनी सांगितलं.

 

दरम्यान , बीड तालुक्यातील पालवन परिसरातील तब्बल शंभर एकर डोंगरावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षांपूर्वी सह्याद्री देवराईची उभारणी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी जगातील पहिल वृक्ष संमेलन देखील भरवण्यात आले होते.

Advertisement

Advertisement