Advertisement

देवस्थाच्या जमिनी अजूनही भूमाफियांच्याच नावावर

प्रजापत्र | Sunday, 13/02/2022
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातिल देवस्थान जमीन घोटाळा संपायचे नाव घेत नसून भूसुधार विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यानी दिलेले वादग्रस्त आदेश अपार जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करून २ महिने उलटल्यानंतरही 'त्या ' जमिनी अजूनही भूमाफियांच्याच नावावर आहेत. जिल्ह्यातील ३ देवस्थानच्या प्रकरणात ही बाब समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाची नेमकी इच्छा काय आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यात भूसुधार विभागाला हाताशी धरून देवस्थानच्या जमिनी धपणारे रॅकेट कार्यरत आहे. भूमाफियांच्या या रॅकेटने अनेक देस्थांच्या जमिनी अशाच घशात घातल्या आहेत. यातील श्रीराम मंदिर पालवन , बालाजी मंदिर धारूर आणि शहेनशाहवली दर्गा या जमिनीकन्हया बतीत भूसुधार उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अपर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लागलेली भूमाफियांनी नावे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तात्काळ कमी होणे आणि त्याठिकाणी पुन्हा देवस्थानचे नाव लागणे आवश्यक होते. मात्र किमान या तीन प्रकरणात तरी अजूनही सदरचे बदल झालेले नाहीत .

आदेश निघाले पण खाली पोचलेच नाहीत
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांनी वादग्रस्त जमिनीचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत. मात्र त्यानंतर सदरचे आदेश तहसील कार्यालय किंवा तहसिलकडून तलाठ्यांना मिल्ने अपेक्षित होते. मात्र अजूनही सदरचे आदेश तहसील कार्यालयात किंवा तलाठ्यांकडे पोचलेच नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दोन महिन्यानंतरही देवस्थान जमिनीच्या मालकीहक्कात भूमाफियाच आहेत. वरिष्ठ कार्यालयांचे आदेश अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेपर्यंत का पोहचत नाहीत आणि पोहचायला कितीवेळ लागणार यावरूनच देवस्थान जमिनीच्या प्रकरणात प्रशासनाची नेमकी इच्छा काय हे समोर येत आहे .

Advertisement

Advertisement