Advertisement

४५ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 10/02/2022
बातमी शेअर करा

केज दि.१० – एका ४५ वर्षीय महिलेने साडीच्या लेसच्या मदतीने गोठ्यातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील जवळबन येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या महिलेने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

 

                         धारूर तालुक्यातील उमऱ्याचीवाडी येथील गोविंद वचकरण हे सालगडी म्हणून केज तालुक्यातील जवळबन येथे करपे नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात कामाला होते. त्यांची पत्नी पार्वती गोविंद वचकरण ( वय ४५ ) या महिलेने अज्ञात कारणावरून गुरुवारी दुपारी शेतातील गोठ्यात असलेल्या लोखंडी आडूला साडीच्या लेसच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, जमादार राहुल भोसले, पोलीस नाईक परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी भेट घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. रात्री शवविच्छेदन सुरू होते. दिगंबर वैजनाथ करपे यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement