Advertisement

जिल्ह्याला मिळाले १३ पशुधन विकास अधिकारी

प्रजापत्र | Thursday, 10/02/2022
बातमी शेअर करा

बीड-राज्य शासनाच्या पशु संवर्धन विभागाने महाराष्ट्र पशु संवर्धन सेवा गट - अ अंतर्गत सरळ सेवेने नियुक्त केलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती यादी निर्गमित केली असून, यांतर्गत बीड जिल्ह्यातील १३ पशु वैद्यकीय दवाखान्यांना आता पूर्णवेळ पशु धन विकास  अधिकारी मिळाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत. 

 

      धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे बीड जिल्ह्यात नुकतेच उपजिल्हाधिकारी दर्जाचे व कार्यकारी अभियंता दर्जाचे पूर्ण वेळ अधिकारी प्राप्त होऊन जिल्ह्यातील प्रभारी राज मोठ्या प्रमाणात संपुष्टात आले होते. त्या पाठोपाठ १३ ठिकाणी पशुधन विकास अधिकारी मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. बीड जिल्ह्यातील गंगामसला ता. माजलगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाणन्यास डॉ. रणजित शेंगुळ, चौसाळा ता. बीड येथे डॉ. सुनील यादव, चकलंबा ता. गेवराई येथे डॉ. पंकज बहिरवाळ, गढी ता. गेवराई येथे डॉ. श्रुती भोसले, तलवाडा ता. गेवराई येथे डॉ. विकास अंबती, नेकनूर ता. बीड येथे डॉ. सचिन थोरात, मस्साजोग ता. केज येथे डॉ. दीक्षांत जोगदंड, नांदूर घाट ता. केज येथे डॉ. अभिषेक रंधवे, सादोळा ता. माजलगाव येथे डॉ. आकाश राऊत, सिरसाळा ता. परळी येथे डॉ. अरुण घोळवे, माजलगाव येथे डॉ. पल्लवी चव्हाण, टाकलसिंग ता. आष्टी येथे डॉ. प्रदीप नंदनवरे, चिंचोली माळी ता. केज येथे डॉ. प्राजक्ता भोळे या अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली असून शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लागलीच रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement