Advertisement

कोरोनाबाबत दिलासादायक बातमी

प्रजापत्र | Saturday, 10/10/2020
बातमी शेअर करा

महाराष्ट्रात घटली कोरोनाची ताकत आता बाधितांपासून संसर्गाचा धोका एकालाच

बीड : देशभरात अजूनही कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढती असली तरी आता कोरोनाच्या संदर्भाने राज्याला दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रासह २३ राज्ये आणि ५ केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाची इतरांना संसर्ग करण्याची क्षमता (आर व्हॅल्यू ) १ टक्क्याच्या खाली आली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.  याचा अर्थ आता या राज्यांमध्ये एका कोरोनाग्रस्तांपासून  एकालाच संसर्ग होऊ शकतो. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे मोठे यश ठरणार आहे.
देशातील ककोरोनाचे आकडे अजूनही वाढते आहेत. संसर्गाचे प्रमाण देखील ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. मात्र अशा वातावरणातही महाराष्ट्रासह तब्ब्ल २३ राज्ये आणि ५ केंद्र शासित प्रदेशांमध्ये संसर्ग पसरविण्याची कोरोना विषाणूची क्षमता कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. कोरोनाची आरटी किंवा आर व्हॅल्यू  २३ राज्यात १ टक्क्यापेक्षा कमी आली आहे. महाराष्ट्रात ही व्हॅल्यू ०. ८९ % इतकी आहे. कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली असली तरी आर व्हॅल्यू कमी झाल्याने कोरोनाची ताकत घटल्याचे संकेत आहेत.

काय असते आर व्हॅल्यू  ?

कोणत्याही साथ रोगात आर व्हॅल्यू किंवा आरटी फॅक्टर महत्वाचा मानला जातो. विषाणूचा पुनरुत्पादन क्रमांक म्हणजे आर व्हॅल्यू असते. या क्रमांकावरून बाधित व्यक्ती  किती लोकांपर्यंत हा संसर्ग पोहचवू शकतो हे तपासले जाते . ही आर व्हॅल्यू एक टक्क्यापेक्षा कमी येणे म्हणजे एक बाधित व्यक्ती स्वतःपासून केवळ एका व्यक्तीला संसर्ग पोहचवू शकतो. कोणत्याही ठिकाणी साथरोगाच्या बाबतीत ही आर व्हॅल्यू १ टक्क्यापेक्षा कमी होणे महत्वाचे मानले जाते. महाराष्ट्रासह २३ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता ती परिस्थिती निर्माण झाली आहे.

बाधितांचे प्रमाण जास्तच
महाराष्ट्रातील आर व्हॅल्यू कमी झाली असली तरी संसर्ग मोठ्याप्रमाणावर पसरलेला असल्याने बाधितांचे प्रमाण मात्र अजूनही अधिक आहे. महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट आजघडीला १७.५८ % इतका आहे. गोव्यात हा दर सर्वाधिक ३० % तर त्याखालोखाल सिक्कीम १९. ८२ % आहे.   त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. बिहारचा पॉझिटिव्हिटी दर देशात सर्वात कमी म्हणजे अवघा १.१८ % इतका आहे. 

Advertisement

Advertisement