Advertisement

गेस्ट हाऊसमध्ये जुगाराचा डाव

प्रजापत्र | Tuesday, 08/02/2022
बातमी शेअर करा

नागपूर : तहसील पोलीस स्टेशन हा गजबजलेला आणि मार्केट परिसर. यातील एका गेस्ट हाऊसमध्ये तास पत्ते जुगार खेळला जात होता. त्यावर पैसे लावले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. त्या ठिकाणी 16 जण पैसे लावून जुगार खेळत होते. पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. सोबतच कॅश, मोबाईल, वाहन असा 3 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आता शोध घेत आहे की, या ठिकाणी नेहमी अशाप्रकारे जुगार खेळल्या जात होता का आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली.

Advertisement

Advertisement