आष्टी/केज/ वडवणी वार्ताहर :- प्रवीण पोकळे, डी.डी. बनसोडे ,बाबुराव जेधे
बीड जिल्ह्याती पाच पैकी दोन नागपंचयातीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढत पाहायला मिळणार आहे . तर आष्टी , पाटोदा , केज येथे प्रत्यकी एकच अर्ज आल्याने निवडीची औपचारिकता बाकी आहे . वडवणी आणि शिरूर मध्ये मात्र राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत होणार आहे.
आष्टी नगरपंचायतीत भाजपच्या उमेदवार पल्लवी स्वप्निल धोंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने आष्टीत निवडीची औपचारिकता बाकी आहे.
तर पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजप चे सय्यद अबुशेठ यांची भावजई यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे .
तर शिरूर मध्ये भाजपाकडून प्रतिभा रोहिदास गाडेकर तर
राष्ट्रवादी कडून शेख शयाना नसीर यांचे अर्ज दाखल झाल्याने भाजप व राष्ट्रवादी मध्ये लढत होणार आहे.
केज नागरपंच्यातमधील नगराध्यक्ष पदासाठी हारून इनामदार यांच्या जनविकास आघाडीच्या सीता बनसोड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे .
वडवणी नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीकडून वंदना शेषराव जगताप यांनी तर भाजप कडून मंगला राजाभाऊ मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून येथे निवडणुकीत चुरस व कोण निवडून येईल याबद्दल उसुकता आहे.