Advertisement

वृध्द महीलेचे प्रेत धारूर तहसीलात

प्रजापत्र | Tuesday, 08/02/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर  (वार्ताहर ) - तालूक्यातील गावदंरा येथे दलीत समाजाचे वहीवाटी प्रमाणे असणारे स्मशानभुमी वर व रस्त्या वर अतिक्रमण केल्याने वृध्द महीलेचौया अंत्यविधीस संबंधीत अतिक्रमण धारकाने विरोध केल्यने या नातेवाईकानी संबंधीत महीलेचे प्रेतच तहसीलकर्यालया समोर आणूण ठेवले. संबंधीत स्मशानभुमीचा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय हा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार हे घटनास्थळी गेले आहेत.

 

तालूक्यातील गावदंरा येथे मांतग महार चांभार समाजाची  वहीवाटी प्रमाणे गावाचे उत्तरेला स्मशानभुमी आहे. हि स्मशानभुमी अनेक वर्षा पासून असतान शेजारील शेतकऱ्यांने जाणारे येणारे रस्त्या वर व स्मशानभुमी वर अतिक्रमण केल्याने या पुर्वी काही अंत्यसंस्कार करतिना अडथळा आणला होता.सोमवार दि 7 फेब्रुवारी रोजी दलीत समाजातील वृध्द महीलासरूबाई मारूती सौंदरमल 90 वर्ष यांचे निधन झाले. अंत्यविधी साठी हे घेऊन जात असताना  दहा वर्षा पासून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांने त्यांन जातान अडवले. यामुळे या नातेवाईकानी अंत्यसंस्कार न करता मंगळवारी सकाळी हे प्रेत नातेवाईकानी तहसील समोर आणूण ठेवले स्मशानभुमी वरचे व रस्त्या वरील अतिक्रमण काढल्या शिवाय अःत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे तहसीलदार व्हि एस शिडोळकर यांनी या नातेवाईकाना समजवण्याचा व प्रश्न सोडवण्याचे अश्वासन दिले माञ प्रश्न मार्गी लावल्या शिवाय अंत्यसंस्कार न करण्या वर नातेवाईक ठाम होते. तहसीलदार गावदंरा येथे घटनास्थळा कडे गेल्या होत्या तहसील चे प्रवेशद्वारा वर ठेवल्याने येथे पोलीस बंदोबंस्त कडक ठेवण्यात आला होता
 

Advertisement

Advertisement