Advertisement

महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार सोबती यांचे निधन

प्रजापत्र | Tuesday, 08/02/2022
बातमी शेअर करा

बीआर चोप्रा यांच्या महाभारतातील भीम प्रवीण कुमार सोबती यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेते मणक्याच्या समस्येने त्रस्त होते. मात्र, मृत्यूचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी प्रवीण अॅथलीट होते.

प्रवीण आजारी होते
गेल्या वर्षी एका मीडिया मुलाखतीत प्रवीण कुमार म्हणाले होते की, मी खूप दिवसांपासून घरीच आहे. तब्येत ठीक नाही, त्यामुळे डॉक्टरांनी अनेक प्रकारचा आहार वर्ज्य करण्यास सांगितले आहे. मणक्याची समस्या देखील आहे. माझी पत्नी वीणा माझी काळजी घेते. एक मुलगी असून तिचे लग्न झाले आहे आणि ती आता मुंबईत राहते.

 

अर्जुन पुरस्कारप्राप्त होते प्रवीण
अभिनयात येण्यापूर्वी प्रवीण हॅमर आणि डिस्कस थ्रोचे खेळाडू होते. त्यांनी आशियाई खेळांमध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी चार पदके जिंकली. दोन ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्तम योगदानासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच प्रवीण यांना सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) डेप्युटी कमांडंटची नोकरीही मिळाली होती. क्रीडा क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी चित्रपटात येण्याचा निर्णय घेतला.

 

प्रवीण यांची कारकीर्द
प्रवीण यांनी 1981 मध्ये आलेल्या रक्षा चित्रपटातून पदार्पण केले. पण त्यांना ओळख मिळाली ती महाभारतातील भीम साकारल्यानंतर. 1998 मध्ये आलेला 'ट्रेन टू पाकिस्तान' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

Advertisement

Advertisement