Advertisement

MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

प्रजापत्र | Friday, 09/10/2020
बातमी शेअर करा

मुंबई : MPSC ची 200 जागांसाठी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी MPSC परीक्षांना विरोध दर्शवला होता. ही परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी नियोजित होती.याआधी 2 वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.लवकरच MPSC शी चर्चा करून पुढची तारीख जाहीर केली जाईल, तसंच आता जे विद्यार्थी पात्र आहेत त्यातील एकही विद्यार्थी अपात्र ठरवला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
तसंच विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या म्हणून परीक्षा पुढे ढकलल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.मराठा संघटना आणि इतर लोकांच्यासुद्धा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मागण्या आल्याचं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे.

Advertisement

Advertisement