Advertisement

मुलींची छेडछाड रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून मुख्याध्यापकांवर जीवघेणा हल्ला

प्रजापत्र | Friday, 04/02/2022
बातमी शेअर करा

औरंगाबाद - जिल्ह्यातील मणकरणपुरात मुख्याध्यापक आणि शिपायावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.माथेफिरु गावगुंडांनी हा हल्ला केल्याचा संशय असून याप्रकरणी आता गुन्हा दाखल करुन हल्लेखोरांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.मकरणपूर इथं झालेल्या हल्ल्यात मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण आणि शिपाई संतोष जाधव हे जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.काकासाहेब देशमुख महाविद्यालयात हा प्रकार घडलाय. या प्रकारानं महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे.मुलींची छेडछाड रोकण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुख्याध्यापकांसह शिपायावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आता हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी अधिक तपास सुरु केलाय.
 

Advertisement

Advertisement