Advertisement

'सुई-मुक्त' कोविड लस काय आहे?

प्रजापत्र | Friday, 04/02/2022
बातमी शेअर करा

झायडस कॅडिसा या आणखी एका फार्मा कंपनीने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारला लसीचा पुरवठा सुरू केला आहे. ZyCoV-D ही लस सुईमुक्त आहे, याचा अर्थ ती लावताना तुम्हाला सुई टोचण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. केंद्र सरकारने त्याचे 1 कोटी डोस ऑर्डर केले आहेत. ज्यांना आतापर्यंत कोरोनाची लस मिळालेली नाही त्यांना ही लस दिली जाणार आहे.

 

 

अशा परिस्थितीत, निडल फ्री म्हणजेच विना सुईची लस म्हणजे काय आणि ती कशी दिली जाईल? इतर लसींपेक्षा ती वेगळे कशी असेल? जाणून घेऊया...

 

 

 विना सुईची गी लस लोकांना कशी दिली जाईल?
ZyCoV-D ही लस देण्यासाठी कोणत्याही इंजेक्शनची आवश्यकता नाही. ही इंट्रा-डर्मल लस आहे ज्याला स्नायूमध्ये इंजेक्शनची आवश्यकता नसते.
ZyCoV-D लस जेट ऍप्लिकेटर किंवा इंजेक्टरद्वारे दिली जाईल. याद्वारे हाय प्रेशरने लस लोकांच्या त्वचेत टोचली जाते.
सुईचे इंजेक्शन वापरले जात असताना, लिक्विड औषध स्नायूंमध्ये जाते. जेट इंजेक्टरमध्ये दाब देण्यासाठी कॉम्प्रेस्ड गॅस किंवा स्प्रिंगचा वापर केला जातो.
त्याचा आकार स्टेपलरसारखा असतो. याद्वारे लसीचा 0.1 मिली डोस दिला जातो. डिव्हाइसमध्ये तीन भाग असतात - इंजेक्टर, सिरिंज आणि फिलिंग एॅडॉप्टर. एका जेट इंजेक्टरने सुमारे 20,000 डोस दिले जाऊ शकतात.

 

 

 यामुळे वेदना आणि संसर्ग होणार नाही का?
पहिला फायदा असा आहे की, ते इंजेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला होणारा त्रास कमी होतो, कारण ते सामान्य इंजेक्शनप्रमाणे तुमच्या स्नायूंच्या आत जात नाही. रबर बँड लावताना जाणवतो तसा थोडासा दबाव जाणवतो.दुसरा फायदा म्हणजे संसर्ग पसरण्याचा धोका सुईच्या इंजेक्शनपेक्षा खूपच कमी असतो. तसेच, सिरिंज पुन्हा वापरण्याची शक्यता नाही.तसेच, देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना सुईमुळे कोरोनाची लस घेण्याची इच्छा नाही. अशा परिस्थितीत आता त्यांची समस्याही दूर होणार आहे.फार्मजेट, स्पिरिट इंटरनॅशनल, व्हॅलेरिटस होल्डिंग्स, इंजेक्स, एंटरिस फार्मा यांसारख्या कंपन्या जेट इंजेक्टर तयार करतात.

 

 

 ZyCoV-D लसीचे किती डोस आवश्यक असतील?
आतापर्यंत जगभरात जितक्या कोरोना लसी दिल्या जात आहेत, त्या एकतर डोस किंवा दुहेरी डोसच्या आहेत. पण ZyCoV-D ही पहिली लस आहे, जी तीन डोसमध्ये दिली जाईल.ZyCoV-D लसीचे तीन डोस 28-28 दिवसांच्या अंतराने दिले जातील. दुसरा डोस लसीच्या पहिल्या डोसच्या 28 दिवसांनी आणि तिसरा डोस 56 दिवसांनी दिला जाईल.प्रत्येक डोसची किंमत 265 रुपये असेल. तसेच, तुम्हाला सुई-मुक्त एॅप्लिकेटरसाठी 93 रुपये द्यावे लागतील. त्यात जीएसटीचा समावेश नाही.

 

 

 कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी ही लस किती प्रभावी आहे?
ZyCoV-D ही भारतात पूर्णपणे विकसित केलेली दुसरी स्वदेशी लस आहे. झायडस कॅडिलाने 28 हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी केली.
या चाचणीच्या निकालांच्या आधारे, कंपनीने दावा केला आहे की, कोरोनाविरूद्धच्या या लसीचा परिणाम 66.60% झाला आहे. लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसह सर्व वयोगटातील लोकांचा समावेश होता.ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात दीर्घकाळ साठवता येते. तसेच, 25 डिग्री सेल्सियस तापमानात 4 महिन्यांपर्यंत साठवली जाऊ शकते.

 

 

ZyCoV-D ही DNA आधारित लसीपेक्षा चांगली लस आहे का?
ZyCoV-D ही DNA आधारित लस आहे. याकडे जगभरात अधिक प्रभावी व्हॅक्सिन प्लॅटफॉर्म म्हणून पाहिले जाते. हे अशा प्रकारे समजू शकते - मानवी शरीरावर दोन प्रकारच्या विषाणूंद्वारे हल्ले होत असल्याची चर्चा आहे - डीएनए आणि आरएनए. कोरोना व्हायरस हा एक RNA व्हायरस आहे जो सिंगल स्ट्रेंडेट व्हायरस आहे.तर डीएनए डबल स्ट्रेंडेंट असतो आणि मानवी पेशीमध्येही डीएनए असतो. डीएनए लस विषाणूचे आरएनए मधून डीएनएमध्ये रूपांतर करते आणि त्याची कॉपी बनवते. यामुळे विषाणू डबल स्ट्रेंडेड बनतो आणि शेवटी तो डीएनएच्या रूपात तयार होतो.
असे मानले जाते की डीएनए लस अधिक शक्तिशाली आणि प्रभावी आहे. आतापर्यंत स्मॉलपॉक्स ते नागीण यांसारख्या समस्यांवर आतापर्यंत फक्त डीएनए लस दिली जाते.

 

 

 ही लस आता कोणत्या राज्यांमध्ये दिली जाईल?
ZyCoV-D ही लस अहमदाबादमधील झायडस कॅडिला या फार्मा कंपनीने विकसित केली आहे. कंपनीने बुधवारपासून केंद्र सरकारला पुरवठा सुरू केला आहे.
सध्या ही लस सात राज्यांतील लोकांना दिली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement