भूम दि.१०(प्रतिनिधी):तालुक्यातील आंद्रूड निपाणी ईट रस्त्यावर बीड येथील रहिवासी असणारे रवींद्र राख व कृष्णा बांगर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हल्ला करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटने संदर्भात वाशी जि. धाराशिव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
बातमी शेअर करा