Advertisement

मांजरसुंबा घाटात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार; दोघे गंभीर

प्रजापत्र | Thursday, 03/02/2022
बातमी शेअर करा

बीड - भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात 10 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. 3 फेब्रुवारी रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास मांजरसुंबा घाट उताराला हा अपघात घडला. मयत मुलाचे मामा व आजी गंभीररित्या जखमी झाले.त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

शेख आयान चांद (10)असे मयताचे नाव आहे. 3 रोजी दुपारी परंडा (जि.उस्मानाबाद) येथील लग्न समारंभ आटोपून शेख सिराज दिलावर (25), शेख मीनाबी दीलावर (55) आणि शेख आयान शेख चांद (तिघे रा.नेकनूर ह.मु.बार्शी नाका,बीड) हे सायंकाळी दुचाकीवरुन क्रं.(एम.एच.23 बीए-6301) बीडकडे येत होते. साडेसातच्या सुमारास मांजरसुंबा घाट उतरत असताना अज्ञात वाहनाने शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात शेख आयान चांद याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबतचे मामा शेख सिराज आणि आजी शेख मीनाबी हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना दुसर्‍या वाहनातून तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement