Advertisement

ना सुट्टी, ना वेळेची मर्यादा, लवकरच मिळणार २४ तास RTGS सेवा

प्रजापत्र | Friday, 09/10/2020
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-आरबीआयनं आज एक मोठी घोषणा केली असून, २०२० डिसेंबरपासून २४ तास ३६५ दिवस RTGS सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच इन्स्टंटद्वारे पैसे हस्तांतरित करणंही सहजसोपं होणार आहे. आठवड्याच्या सात दिवसांतील २४ तासांत कोठेही, कधीही पैसे पाठवणं आता शक्य होणार आहे. ऑनलाईन बँकिंग निधी हस्तांतरणाची आरटीजीएस (Real Time Gross Settlement) सेवा २४ तास ३६५ दिवस वापरता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नं केली आहे. आरबीआयकडून ऑनलाईन मनी ट्रान्सफर-आरटीजीएस सुविधा २४ तास सुरू केली जाणार आहे. आरटीजीएस सुविधा डिसेंबर २०२० पासून २४ तास ३६५ दिवस उपलब्ध असेल. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाऊ शकतात. 

 

आता काय आहे वेळ?
आतापर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी साडेचार या वेळेत फक्त बँकेच्या कार्यालयीन दिवसात RTGSची सेवा वापरता येत होती. शनिवारी दुपारी अडीचपर्यंत ही सुविधा उपलब्ध होती. बँक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणताही व्यवहार करता येत नाही. आरटीजीएसकडून पैसे पाठविण्यासाठी नाममात्र शुल्क द्यावे लागते, जे आपण आपल्या बँकेच्या माध्यमातून देऊ शकता.

 

आरटीजीएसवर शुल्क किती?  
बँका आरटीजीएस सेवेसाठी आपल्याकडून शुल्क घेतात. फक्त पैसे पाठवणाऱ्याकडूनच हे शुल्क आकारते जाते. पैसे घेणाऱ्यास कोणतेही शुल्क लागत नाही.
२ लाख ते ५ लाख – ३० रुपये
५ लाखांपेक्षा जास्त- ५५ रुपये

 

 

Advertisement

Advertisement