Advertisement

बीडमध्ये शिक्षीकेला १ लाख ३१ हजाराला फसविले

प्रजापत्र | Thursday, 03/02/2022
बातमी शेअर करा

बीड - शहरातील एका उर्दु शाळेतील शिक्षीकेला फोनवरून बँकेच्या क्रेडीट कार्डविषय ओटीपी विचारून बँक खात्यातुन १ लाख ३१ हजार ३६७ रूपयांची रक्कम काढून फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्षीकेच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

बीड शहरातील एका उर्द प्राथमिक शाळेतील एका शिक्षीकेला मोबाईलवरून फोन आल्यानंतर त्याच्याकडे ओटीपीची मागणी केली. ओटीपीद्वारे समोरच्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातील १ लाख ३१ हजार ३६७ रूपये काढुन त्यांची फसवणुक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कलम ४२० भा.द.वि.सह कलम ६६.६६क भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.नि.सानप करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement