Advertisement

तीन लाखासाठी विवाहितेस घराबाहेर काढले

प्रजापत्र | Wednesday, 02/02/2022
बातमी शेअर करा

केज दि.०२ – नवीन घर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचा मारहाण करीत छळ करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना मंगरुळ ( ता. कळंब ) येथे घडली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

        केज तालुक्यातील नाव्होली माहेर असलेल्या आश्विनी बालाजी बनसोडे ( वय २८ ) या महिलेचा विवाह मंगरुळ ( ता. कळंब ) येथील बालाजी मल्हारी बनसोडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती बालाजी मल्हारी बनसोडे, सासु द्वारकाबाई मल्हारी बनसोडे, सासरा मल्हारी नरसींग बनसोडे, दिर शाम मल्हारी बनसोडे, ननंद आश्विनी रामलींग वनकळस यांनी संगनमत करीत नवीन घर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी आश्विनी बनसोडे हिस तगादा लावला. तीने तेवढी रक्कम आणण्यास नकार दिल्याने सतत शिवीगाळ व मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला. तू पैसे न आणल्यास तुला जीवे मारून टाकू अशी धमकी देत ८ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातून हाकलून दिले. अशी फिर्याद २ फेब्रुवारी रोजी आश्विनी बनसोडे यांनी दिल्यावरून पती बालाजी बनसोडे, सासु द्वारकाबाई बनसोडे, सासरा मल्हारी बनसोडे, दिर शाम बनसोडे, ननंद आश्विनी वनकळस यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार अभिमान भालेराव हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement