Advertisement

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

प्रजापत्र | Wednesday, 02/02/2022
बातमी शेअर करा

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली आहे. 30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 

तीन दिवसांपूर्वी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठा झटका आहे.

 

रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले. त्यांनी “दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका केली होती. देव यांना ‘मुजर्मि’, ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.

Advertisement

Advertisement