Advertisement

मुंबईत मराठीत न बोलणाऱ्या सराफाला मनसेचा चोप

प्रजापत्र | Friday, 09/10/2020
बातमी शेअर करा

मुंबई : मनसेने चोप दिल्यानंतर आणि माफी मागत नाही तोवर दुकान उघडू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर या मुंबईतल्या कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स चालवणाऱ्या सराफाने लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली आहे. माझ्याशी मराठीत बोला असा आग्रह धरल्याने लेखिका शोभा देशपांडे यांना या सराफाने हीन वागणूक दिली तसंच दोन महिला पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं अशा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला. एवढंच नाही तर त्या काल दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या. या प्रकरणात आज मनसेने खळ्ळं खट्याक केल्यानंतर मुजोर सराफाने अखेर लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली. सुमारे २१ तासांपेक्षा जास्त काळानंतर मराठी लेखिका शोभा देशपांडे यांचं मुंबईतलं ठिय्या आंदोलन संपलं आहे. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

 

Advertisement

Advertisement