मुंबई-अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबईतील माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राज्य सरकारने दणका दिला आहे. राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्या मालकीचा नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेल अँण्ड बारचा परवाना अखेर रद्द केला आहे. परवाना रद्द करण्याचे आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने दिला आहे. 1997 मध्ये समीर वानखेडे यांनी बारचा परवाना मिळवला होता. परवाना घेत असताना त्यांचे वय अठरा पेक्षाही कमी होते. या कारणावरुन त्यांच्या मालकीच्या बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
1997 मध्ये परवाना घेत असताना समीर वानखेडे यांचे वय अठरा पेक्षाही कमी होते. मात्र त्यांनी खोटी माहिती देऊन शासनाकडून हॉटेल अँण्ड बारचा परवाना घेतला होता. ही माहिती उघड झाल्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून समीर वानखेडे यांच्या बारचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. एनसीबीच्या बदलीनंतर समीर वानखेडेंना हा दुसरा मोठा धक्का लागला आहे.