Advertisement

यूपीएससीकडून अभियांत्रिकी सेवा परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 02/02/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी (ESE exam) प्रवेशपत्र जारी केलं आहे. अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022 साठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून प्रवेशपत्र  upsc.gov.in वेबसाईटवर जारी करण्यात आली आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022 चा अर्ज भरला असेल त्यांना त्यांच्या लॉगीन मध्ये प्रवेश पत्र उपलब्ध होतील. अभियांत्रिकी सेवा परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे करण्यात आलं आहे. ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे. सामान्यज्ञान आणिअभियांत्रिकी क्षमता चाचणी हा पेपर सकाळच्या सत्रात 10 ते 12 या वेळेत पार पडेल. अभियांत्रिकीतील विद्याशाखे संबंधी पेपर दुपारी दोन ते पाच या वेळेत पार पडेल. दोन्ही पेपर साठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एकच प्रवेश पत्र जारी करण्यात आलं आहे.

 

प्रवेश पत्र डाऊनलोड कसं करायचं?
प्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या. होमपेज वरील अ‌ॅडमिट कार्ड या लिंक वर क्लिक करा. यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर नोंदवून लॉगिन करा. यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट सोबत ठेवा.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन
केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्रांचा पत्ता जाहीर केला आहे. परीक्षेला उशीर होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्राची माहिती करून घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. परीक्षेचा अभ्यास यापूर्वी जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि परीक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisement

Advertisement