औरंगाबाद-जिल्ह्यात वैजापूरजवळ दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला आहे तर १२ ते १५ जण जखमी झाले आहेत. मृत चौघेही नाशिकमधले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात घडला.
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरजवळ दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून १२ ते १५ जण जखमी झाले आहेत. चारही मृत व्यक्ती नाशिकमधल्या आहेत. हे वऱ्हाड जालन्यातील परतूर येथील विवाह आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले होते. सोमवारी सकाळी हा अपघात घडला. जखमींपैकी काहींना नाशिकमध्ये तर काहींना औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
बातमी शेअर करा