बीड : मराठवाड्यात मागील दहा दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर हळू हळू ओसरतोय, असे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात रविवारी कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळून आली. दिवसभरात 1885 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 3775 रुग्णांची रुग्णालयातून सुटी झाली. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर इतर जिल्ह्यांत हा आकडा निरंक आहे.
जिल्ह्यात चार दिवसात कोरोनामुक्तांनी ओलांडली हजारी
बीड-जिल्ह्यासाठी नव्या रुग्णसंख्यांपेक्षा कोरोनामुक्तांची वाढती संख्या दिलासादायक बाब आहे. मागच्या चार दिवसात 1009 जणांनी कोरेानावर मात केली. तर यावेळी 724 रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही बळी नोंदविला गेला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
मराठवाड्यात रविवारी किती रुग्ण?
मराठवाड्यात रविवारी विविध जिल्ह्यांत आढळलेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे-
औरंगाबाद-474
जालना-147
परभणी- दिवसभरात 1885 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 3775 रुग्णांची रुग्णालयातून सुटी झाली. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर इतर जिल्ह्यांत हा आकडा निरंक आहे.102
हिंगोली-136
नांदेड-305
लातूर-350
उस्मानाबाद- 194
बीड- 177
राज्याची आकडेवारी काय?
राज्यातही रविवारी 22,444 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 39,015 रुग्ण बरे झाले. शनिवारच्या तुलनेत रुग्णसंख्या 5,527 ने घटली.
तिसऱ्या लाटेत गंभीर आजारी, वृद्धांचेच बळी
दरम्यान, औरंगाबादचा विचार करता, तिसऱ्या लाटेत 12 ते 28 जानेवारी दरम्यानच्या मृत्यूंच्या नोंदी पाहता, एकूण 28 जणांचा मृत्यू झाला. यात 21 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. सर्व मृतांचे वय 51 वर्षांपुढील आहे. तर बहुतांश रुग्णांचे वय 80 च्या धरात आहे. यासह त्यांना आधापासूनच विविध आजार होते, असेही लक्षात आले आहे.
नांदेडची स्थिती काय?
नांदेड जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 613 अहवालापैकी 305 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 250 तर अँटिजेन तपासणीद्वारे 55 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 280 एवढी झाली असून यातील 96 हजार 81 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.