Advertisement

लता मंगेशकर कोरोनामुक्त

प्रजापत्र | Sunday, 30/01/2022
बातमी शेअर करा

मुंबई-गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ते सध्या कोरोनामुक्त झाल्या असून, मात्र अद्याप त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. टोपे म्हणाले की, लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होताना दिसत आहेत. लता दिदींचे व्हेंटिलेटर देखील काढण्यात आले आहे. असे राजेश टोपे म्हणाले. लता दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी विठ्ठलाला साकडे देखील घातले आहे.

 

 

कोरोनाची लागण झाल्यानंतर 92 वर्षीय लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आले होते. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून, त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाबरोबरच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर नरज ठेऊन आहेत.मोलकरणीला कोरोना झाल्यानंतर झाली होती लागण घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर कोरोनाच्या विळख्यात सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांना घराजवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement