मराठा क्रांती मोर्चाचे वातावरण राज्यभर पेटलेले असताना गुणरत्न सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहु महाराज यांचे वंशज खा. छत्रपती संभाजी राजे यांना अफजलखानाची औलाद असं संबोधतात तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर "एक राजा बिनडोक" अस जाणीवपूर्वक वक्तव्य करून महाराष्ट्रतील राजकीय,सामाजिक व जातीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समनव्यक पूजा मोरे यांनी केला आहे.
मराठी वाहिनी वर सुरू असणाऱ्या एक चर्चेत गुणरत्न सदावर्ते हे बोलत असताना त्यांनी जाणीवपूर्वक खा. संभाजीराजे यांना संबोधून बेताल वक्तव्य केले.पोलीस प्रशासनाने अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सूचना दिली पाहिजे. आज राज्यात विविध ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध व्यक्त केला जात असताना त्यांच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी खा. उदयनराजे यांच्यावर मुक्ताफळे उधळली त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करतो.
मराठा क्रांती मोर्चा हा शांततेच्याच मार्गाने चालत आहे. सर्व जाती धर्माविषयी सहानुभूती असणारा हा समाज आहे.'मराठा आरक्षण हे आम्ही मिळविणारच"ही भूमिका घेऊन खा.छत्रपती संभाजी राजे चालत आहेत. ते सर्व समाजाबद्दल आपुलकीने वागत असतात परंतु आमच्या राजेंबद्दल कुणी जर असे बेताल वकत्व करत असेल तर त्यांचा आम्ही समाचार हा घेणारच अशी भूमिका पूजा मोरे यांनी व्यक्त केली आहे.