मुंबई :"दोन्ही राजांचा बंदला पाठींबा दिला आहे असे कुठेही माझ्या वाचनात आले नाही. एक राजा बिनडोक आहे, ज्या माणसाला घटना माहीत नाही ते मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्व आरक्षण रद्द करा असे वक्तव्य करतात. अशा माणसाला भाजपाने राज्यसभेत कसं पाठवलं हा प्रश्न आहे," असं प्रकाश आंबेडकर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले
मराठा आरक्षणावर विविध मराठा संघटना बैठका घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची भूमिका घेतली आहे. या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देत असताना त्यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.
संभाजीराजे यांनी भूमिका घेतली परंतु ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष देत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
प्रजापत्र | Thursday, 08/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा