मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने आज वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. मात्र, एक हजार चौरस फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकणार आहे. (The state cabinet has decided to allow the sale of wine in supermarkets)
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर चर्चेअंती हा वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात नवी वाईन धोरण राबवणार
राज्य सरकारने राज्यात नवे वाईन धोरण राबवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने आता वाईन सुपरमार्केटमध्ये विकण्यास परवानगी दिली आहे. २०२३ पर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. यासाठीच राज्य मंत्रिमंडळाने आजचा निर्णय घेतला आहे.