Advertisement

जिल्ह्यात ३ नगरपंचातीवर येणार महिला राज , तर केजमध्ये अनुसूचित जातीचा नगराध्यक्ष

प्रजापत्र | Thursday, 27/01/2022
बातमी शेअर करा

बीड : राज्यातील नगरपंचातींच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील ५ पैकी ३ नगरपंचातीवर आता महिलाराज म्हणजे महिला नगराध्यक्ष असणार आहेत . केजमध्ये अनुसूचित जातीचा नगराध्यक्ष असणार आहे.   तर  वडवणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुले असल्याने याठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम फेब्रुवारीं महिन्यात होणार आहे.

 

राज्यातील नगरपंचातीच्या निवडणुकांची मतमोजणी १९ जानेवारीला झाल्यानंतर सर्वांनाच नगराध्यक्षपदाच्या सोडतीची प्रतीक्षा होती, त्यानुसार गुरुवारी नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीसाठी  केज आरक्षित झाले आहे, तर आष्टी, पाटोदा आणि शिरूर महिला राखीव झाले आहेत. त्यामुळे आता या ३ ठिकाणी महिला नगराध्यक्ष दिसणार आहेत. वडवणीत मात्र हे पद खुले झाले असून त्याठिकाणची चुरस आता आणखीच वाढणार आहे.
 

 

अनुसूचित जाती   : केज
सर्वसाधारण महिला : आष्टी, पाटोदा, शिरूर
सर्वसाधारण : वडवणी

 

Advertisement

Advertisement