नेकनूर दि.२७ (वार्ताहर)-
ग्रामीण भागातही अनेक खेळाडू दडलेले असतात . परंतु , त्यांना संधी मिळत नाही . त्यामुळे असे खेळाडू आपल्या कामगिरीतून समाजासमोर यावेत व ग्रामीण क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे , या हेतूने नेकनूर येथे जिजाऊ जयंती निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याचे जी प सदस्य भारत काळे यांनी सांगितले . नेकनूर येथे जिजाऊ जन्मोत्सवनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत १५ संघानी सहभाग घेतला होता.१२ जानेवारीपासून सुरु झालेल्या या स्पर्धेचा २६ जानेवारी रोजी समारोप झाला असून या स्पर्धेत अंतिम सामन्यात बंकटस्वामी संघाला धूळ चारत अण्णासाहेब पाटील संघाने विजेतेपद पटकावले आहे.यावेळी विजेत्या संघाला २१ हजार १११ तर उपविजेता संघाला ११ हजार ११ बक्षीस प्रदान करण्यात आले.
निनगुर येथे प्रतिवर्षी जिजाऊ जन्मोत्सवनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल स्पर्धा आयोजित करण्यात येतात.यावर्षी १५ संघानी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.२६ जानेवारी रोजी बंकटस्वामी संघ आणि अण्णासाहेब पाटील संघामध्ये सामना पार पडला.यात प्रथम फलंदाजी करताना अण्णासाहेब पाटील संघाने ८ षटकात ९९ धावा रचल्या.प्रत्युत्तर देताना बंकटस्वामीच्या संघाची पुरती धमछाक झाली होती.८ षटकात अण्णासाहेब पाटील संघाने केवळ ५५ धावा देत प्रतिस्पर्धी संघाचा खुर्दा उडवत विजेतेपद पटकविले.यावेळी सामनावीरचा पुरस्कार बंटी बनसोडे यांना देण्यात आला असून विजेत्या संघाला जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांच्यावतीने २१ हजार १११ रुपये देण्यात आली.तर उपविजेता संघाला शिवसेना युवा नेते रामनाथ घोडके यांनी ११ हजार १११ तसेच तृतीय संघाला ग्रामपंचायत सदस्य जयदीप काळे यांनी ७ हजार ७७७ तर चतुर्थ संघाला ग्रामपंचायत सदस्य फुलचंद काळे यांनी ५ हजार ५५५ बक्षीस दिले.