बीड-काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करत बीडमध्ये भाजपच्या वतीने पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.सोमवारी (दि.२४) भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली 'जोडो मारो'आंदोलन करण्यात आले.यावेळी मस्के यांनी पटोलेंच्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे काँग्रेसची संस्कृती चव्हाट्यावर आली असल्याचे मत व्यक्त केले.
काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ज्यांच्या बायका सोडून जातात त्यांचा मोदी होतो अशी टिप्पणी केल्यानंतर आज राज्यभरात भाजपने पटोलेंच्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे.सोमवारी (दि.२४) बीडमध्ये भाजपच्या वतीने पटोलेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष मस्के म्हणाले,एकशे पंचवीस वर्षाची परंपरा आणि इतिहास लाभलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार नेत्यांकडून पंतप्रधाना बाबत केवळ द्वेषापोटी गरळ ओकून काँग्रेस पक्षाची ईभ्रत रस्त्यावर आणली आहे. हा गलिच्छपणा आता आम्ही खपवून घेणार नसून याची दखल काँग्रेस पक्षाने घ्यावी असे ते म्हणाले.या आंदोलनात प्रा.देविदास नागरगोजे,सलिम जहागीर, विकांत हजारी,भाग्यश्री ढाकणे, संगिता धसे, डॉ लक्ष्मण जाधव, डॉ.जयश्री मुंडे, संध्या राजपुत,शातीनाथ डोरले, अनिल चांदणे, कपिल सौदा,प्रमोद रामदासी, बालाजी पवार,अशोक पांढरे, शंकर तुपे, बंडु मस्के,भुषण पवार, वसंत गुंदेकर, पंकज धांडे, रवींद्र कळसाने,आबा येळवे, शरदराव बडगे, दिलीप डोंगर,सचिन आगाम, बंटी भिसे आदींचा सहभाग होता.