Advertisement

अंबाजोगाईत जुगार अड्ड्यावर छापा; 16 जणांवर गुन्हा

प्रजापत्र | Sunday, 23/01/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - पत्त्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या 16 जणांना छापा मारुन रंगेहात पकडण्यात आले. शहरातील क्रांतीनगर येथे 23 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहर पोलीसांनी ही कारवाई केली.

 

 

 

क्रांतीनगरमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत जुगारअड्डड्यावर छापा मारण्यात आला. या कारवाईत जुगाराचे साहित्य, दुचाकी आणि नगदी रक्कम असा एकूण 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो.ना.श्रीकांत चौधरी यांच्या फिर्यादीवरुन आरोपी जफर उर्फ बाबा सलिम शेख (34), अमोल लक्ष्मण पौळे (35), युनूस ईब्राहिम शेख (32), बापु शिवाजीराव गोमसाळे (53), शेख सलमान शेख निखार (24), सचिन विनायक गालफाडे (34), सिकंदरखान गुलाबखान पठाण (48), शेख सादेक, बाबा सरपंच, प्रकाश मेंडके, जावेद पठाण, आरटीओ एजंट सलीम, आप्पा कांबळे (सर्व रा.अंबाजोगाई) व इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

 

सदरची कामगिरी पोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुर्यवंशी, सहायक फौजदार बोडखे,पोह.नागरगोजे, पोना.येलमटे,चौधरी यांनी केली.

Advertisement

Advertisement