सातारा : पश्चिम महाराष्ट्राला हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 जणांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केली आहे. आत्महात्येमध्ये कौटुंबीक वाद आणि आजारपण अशी कारणं समोर आली आहेत.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 25 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांचा सामावेश आहे. एकाच दिवशी पाच जणांनी गळफास लाऊन स्वतःचे आयुष्य संपवल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. आत्महात्येमध्ये कौटुंबीक वाद आणि आजारपण अशी कारणे समोर आली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
बातमी शेअर करा