नवी दिल्ली-उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. उपराष्ट्रपती सध्या हैदराबादमध्ये असून आठवडाभरासाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करून घेण्याचे आणि आयसोलेशनमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे.त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
जर ते 7 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिले तर ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. संसद संकुलात आतापर्यंत 875 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 271 राज्यसभा सचिवालयातील आहेत.
बातमी शेअर करा