Advertisement

राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

प्रजापत्र | Sunday, 16/01/2022
बातमी शेअर करा

Maharashtra School : राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यावर बोलताना आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली. टोपे म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून  पुनर्विचार केला जाईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.

 

 

15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना लस- टोपे

लसीकरणाच्या सुरुवातील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आपण 62 टक्क्यांपर्यंत लोकांना दुसरा डोस दिला आहे, असं टोपे म्हणाले. जे लोकं डोस घेत नाहीत त्यांची जनजागृती करुन त्यांनाही डोस दिला जाईल. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना आपण लस आतापर्यंत दिली, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे.

देखील टोपे यांनी सांगितलं. 

 

 

 

Advertisement

Advertisement