बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता झपाट्याने वाढू होऊ लागली असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.रविवारी १८१४अहवालात १२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता जिल्ह्यात ही नव्या रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे.रविवारी अंबाजोगाई २४,आष्टी ९,बीड २३,धारूर ३,गेवराई ८,केज ३,माजलगाव १०,परळी २६,पाटोदा १०,शिरूर ५ तर वडवणीत ४ रुग्ण आढळून आले.दरम्यान नागरिकांनी आता वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
बातमी शेअर करा