मुंबई-देशांतर्गत पातळीवर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यानंतरही महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश यांच्यासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटर पार असल्याचे दिसून येते.मात्र झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राशन कार्ड धारकांसाठी 26 जानेवारी 2022 पासून एका ठराविक मर्यादेपर्यंत प्रति लिटर पेट्रोलवर 25 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे.
एका आढावा बैठकीत मुख्यमंत्री सोरेन यांनी 26 जानेवारीपासून गरिबांना पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर 25 रुपये अनुदान देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील शिधापत्रिकाधारक दुचाकी चालकांना पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर 25 रुपये सवलत देण्याची योजना 26 जानेवारीपासून राबविण्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.