बीड : जल जीवन अभियानातील कंत्राटी अभियंत्यांची निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणावर झाल्या होती. 'प्रजापत्र 'ने याबद्दल सर्वात अगोदरआवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर सदर निवड प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या यावर सचिवांनी दिले आहेत. तसेच या निवड प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यात जल जीवन अभियान राबविण्यासाठी कंत्राटी अभियंत्यांच्या सेवा घेण्यात येणार आहेत . यासाठीची जीवद प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबविली होती. मात्र सदर प्रक्रिया राबविताना नियमबाह्य पद्धतीने निवड करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ज्या ५ व्यक्तींची निवड झाली त्यातील अनेकांकडे कागदपत्रे देखील बोगस असल्याच्या तक्रारी अगदी मंत्रालय पातळीवर करण्यात आल्या होत्या. या संस्थांना नियंडावलून ५ पेक्षा अधिक कामे देण्यात आली. याबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी असतानाही जिल्हा परिषदेच्या पातळीवर यात कारवाई होत नव्हती.
आता या प्रकरणात थेट मंत्रालयातूनच कारवाई झाली आहे. सदर कंत्राटी अभियंत्यांच्या निवडीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने स्थगिती दिली असून सदर निवड प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बातमी शेअर करा