Advertisement

चार पिस्टल व तीन जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक

प्रजापत्र | Thursday, 13/01/2022
बातमी शेअर करा

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : पोलिसांनी पाच जणांच्या ताब्यातून चार पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. या पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद - लातूर रस्त्यावरील तुळजापूर येथीला पाचुंदा तलावाजवळ दोन पुरुष गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पोलिस ठाण्याच्या पथकास दि. 30.डिसेंबर 2021 रोजी मिळाली होती.  यावर पथकाने लागलीच पाचुंदा तलाव परिसर गाठून खंडाळा, (ता. तुळजापूर) येथील राजेंद्र सुरेश कांबळे यांसह एका अल्पवयीन मुलास (विधी संघर्षग्रस्त बालक) पिस्टलसह ताब्यात घेतले होते.

 

या प्रकरणी दाखल असलेल्या तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याच्या उर्वरित तपासादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती सई भोरे-पाटील व तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण, ज्ञानेश्वर कांबळे, पोलिस उपनिरीक्षक राहुल रोटे, श्री. चनशेट्टी, पोहेकॉ अजय सोनवणे, अतुल यादव, पोना- गणेश माळी, लक्ष्मी चव्हाण, अमोल भोपळे, गणेश पतंगे, अजित सोनवणे, बाळासाहेब देवबोणे यांच्या पथकाने तुळजापूर येथील सचिन खंडु जाधव (वय 29), शैलेश श्रीकांत नरवडे, (वय 23), विश्वजीत विजय आमृतराव (वय 25), सौरभ दत्तात्रय टोले (वय 22) यांसह उस्मानाबाद येथील मयुर बापु बनसोडे (वय 26)  यांना दि. 13 जानेवारी रोजी ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे‍ 4 पिस्टलसह 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तुळजापूर पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीचे पोलिस अधीक्षक श्रीमती नीवा जैन व अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement