बीड-जिल्ह्यातील विविध देवस्थानांच्या शेकडो एकर जमिनी परस्पर हडप केल्याचं प्रकरण उघड झालं आहे. मात्र अद्याप संबंधितांवर कसलीच कारवाई होताना दिसत नसल्याचा आरोप करत भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने सोमवारी (दि.१०) 'गोट्या खेळो' आंदोलन करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे,संदिप जाधव, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन बीडकर, गणपत गिरी,रोहीदास सौदा आदींची उपस्थिती होती.
यावेळी निवेदनात बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानांच्या शेकडो एकर जमिनी परस्पर हडप केल्याचं प्रकरण उघड झालं आहे. मात्र अद्याप संबंधीतांवर कसलीच कारवाई होताना दिसत नाही.यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे गोट्या खेळो आंदोलन केले. अनेक वेळा सामाजिक संघटनांकडून तक्रारी देखील देण्यात आल्या. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कसलीच कारवाई होत नसल्याने, भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर चक्क गोट्या खेळत प्रशासनाचा निषेध करून आंदोलन केले आहे.